Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्प खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट; ठेकेदारांकडून नियमांची पायमल्ली

Palghar : देशाच्या महत्त्वाकांशी असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सध्या पालघर जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र सदरचे काम करत असताना ठेकेदारांकडून अनेक नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात डहाणू सारख्या हरित पट्ट्यात देखील परवानगी नसताना खोदकामासाठी भूसुरुंग स्फोट केले जात असल्याने परिसरातील अनेक घर धोकादायक बनली आहेत.

देशांतर्गत बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरु आहे. सदरचे काम पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीला सुरु असून याठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. दरम्यान पालघर जिल्ह्यातील डहाणू हा हरित पट्टा आहे. यामुळे या भागात खोदकाम करताना भूसुरंग स्फोट करण्यास शासनाकडून बंदी करण्यात आली आहे. असे असले तरी या परिसरात खोदकाम करण्यासाठी भूसुरुंग लावले जात आहेत. यामुळे परिसरात धोका निर्माण होत आहे.

Pune News: दीनानाथ मंगेशकर रूग्णालयातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; गर्भवती महिला तब्बल साडेपाच तास रूग्णालयातच होती पण..

स्फोटामुळे घरांना पडले तडे

डहाणूच्या गोवने परिसरात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणी करणाऱ्या ठेकेदार कंपनीने अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास भूसुरुंग स्फोट केल्याने परिसरातील अनेक घरांना तडे जाऊ लागले आहेत. नव्याने उभारण्यात आलेल्या घरांना वारंवार हादरा बसून भिंतींना तडे गेल्याने येथील अनेक घर सध्या धोकादायक बनली आहेत. अशा पद्धतीने नियमांची पायमल्ली करत ठेकेदाराकडून मनमानी केली जात असल्याचे बोलले जात आहे.

पालघर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतीकडून बुलेट ट्रेन प्रकल्पाला तक्रारी करून देखील संबंधित अधिकारी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तक्रार स्थानिकांनी पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. सध्या येथील अनेक घर वारंवार होणाऱ्या भूसुरंग स्फोटांमुळे धोकादायक झाली असून या घरांमध्ये येथील कुटुंब भीतीच्या छायेखाली आपला मुठीत घेऊन राहत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply