Pakistan : 'काही पण होऊ द्या पाठिंबा फक्त...', तरुणाला पाकिस्तानचा पुळका, पोलिसांनी शिकवला धडा

Pakistan : पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवला. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ नष्ट केले. या कारवाईनंतर एकीकडे सर्व भारतीय सैन्य दलाचे कौतुक करत आहेत. भारताने अखेर बदला घेतला त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. अशातच भिवंडीमधील एका तरुणाला पाकिस्तानचा पुळका आला. त्याने सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ पोस्ट केली. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या तरुणाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरातील एका तरुणाने इन्स्टाग्राम स्टोरीवर पाकिस्तानचे समर्थन केल्याची पोस्ट केली. त्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अफसर अली अजगर अली शेख (१८ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Dharashiv : पैशांची देवाण- घेवाण करून जनतेची कामे; व्हायरल व्हिडीओने खळबळ

बुधवारी भारतीय सैन्याने पाकिस्तानी अतिरेक्यांवर कारवाई केली. त्याचे संपूर्ण देशवासीयांकडून स्वागत करीत बदला घेतल्याबद्दल आनंदोत्सव साजरा केला जात आहे. अशात भिवंडीमधील अफसर अली अजगर अली शेख या तरुणाने इन्स्टाग्राम स्टेटसवर 'चाहें जो हो जाये सपोर्ट तो बस पाकिस्तान को करेंगे', असा देशविरोधी संदेश ठेवला होता. ही बाब राष्ट्रप्रेमी नागरिकांना समजताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेत देशद्रोही तरुणाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली.

पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलिस कर्मचारी शैलेश भोसले यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी आरोपी युवकास रात्री उशिरा ताब्यात घेतले. त्याविरोधात भा.न्या.सं. कलम १५२ प्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply