
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी (२२ एप्रिल) दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत झाल्याचा दावा सातत्याने केंद्र सरकार व स्थानिक प्रशासनाकडून केला जात होता. मात्र, हा दावा फोल ठरला आहे. दरम्यान, काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यामागील संशयित दहशतवाद्यांचे छायाचित्र आणि रेखाचित्र सुरक्षा यंत्रणांनी जारी केले आहेत. फोटोत असलेल्या चौघांपैकी तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून आसिफ फुजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी त्यांची नावे आहेत. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पहलगाम येथील बैसरन कुरणात पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. दहशतवादी गट लष्कर ए तैयबाची शाखा असलेल्या दि रेझिस्टन्स फ्रंटचे हे सदस्य असल्याचं म्हटलं जातंय. दरीच्या सभोवतालच्या घनदाट पाइन जंगलातून कुर्ता पायजमा घातलेले किमान ५ ते ६ दहशतवादी बैरसन कुराणात आले. त्यांनी एके ४७ ने गोळीबार केला. गुप्तचर संस्थांनी या हत्याकांडाचा सूत्रधार सैफुल्लाह कसुरी उर्फ खालिदचीही ओळख पटवली आहे. तो लष्कर-ए-तोयबाचा एक प्रमुख कमांडर होता. जंगलाचा फायदा घेऊन पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली आहे आणि हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.
|
|
भारताची गुप्तचर यंत्रणा देखील अलर्टवर असून ते या दहशतवाद्यांची माहिती गोळा करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून नंबर प्लेट नसलेली एक संशयास्पद दुचाकी जप्त केली आहे. दहशतवादी याच दुचाकीवरून बैसरन येथे आले असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दोन दहशतवाद्यांनी एम ४ कार्बाइन असॉल्ट रायफल बाळगल्या होत्या तर इतर दोघांनी एके-४७ रायफल बाळगल्या होत्या. “कुरणात पोहोचल्यानंतर, दहशतवाद्यांनी प्रथम बंदुकीच्या धाकावर पर्यटकांना ओलीस ठेवले आणि नंतर सर्व महिला आणि मुलांना दूर राहण्यास सांगितले. ओळख पटवल्यानंतर त्यांनी जवळून गोळीबार केला. नंतर त्यांनी अंदाधुंद गोळीबार केला”, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसने सुत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


