Pahalgam Attack : मोने, लेले आणि जोशींच्या आठवणी; पहलगाम हल्ल्यातील मृतांचे डोबिंवलीत स्मृतीस्थळ उभारणार

Pahalgam Attack : जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २७ पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश होता. यामधील तिघे जण डोंबिवलीतील होते. नातेवाईक असलेल्या तिघांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांच्या आठवणीमध्ये डोंबिवलीमध्ये स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या तिघांच्या आठवणीमध्ये डोंबिवलीमध्ये स्मृतीस्थळ उभारण्यात येणार आहे. डोंबिवली पश्चिम येथील भाग शाळा मैदानामध्ये त्यांचे स्मृतीस्थळ उभारण्याची प्रकिया सुरू झाली आहे.

४ मे रोजी या स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण -डोंबिवली मनपा शहर अभियंता यांनी दिली आहे. आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेला पत्र व्यवहार करून कश्मीरमध्ये मयत झालेल्या तिघांची स्मृतीस्थळ उभारण्यासाठी मागणी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने ठराव तयार करून मंजूर प्रक्रियेमध्ये ठेवला आहे. येत्या ४ मे पर्यंत ठराव मंजूर करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.

डोंबिवलीमध्ये राहणारे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी हे तिघे नातेवाईक आपल्या कुटुंबीयांसोबत जम्मू- काश्मीरमध्ये फिरण्यासाठी गेले होते. पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले असता त्याठिकाणी २२ एप्रिल रोजी भ्याड दहशतवादी हल्ला झाला. यावेळी दहशतवाद्यांनी या तिघांची हत्या त्यांच्या कुटुंबीयांसमोर केली. 'तुम्ही मुस्लिम आहात का? तुम्हाला कलमा येते का?' असे प्रश्न विचारत दहशतवाद्यांनी तिघांवर देखील गोळ्या झाडल्या होत्या.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply