Pachora News : हरिनाम सप्ताहाचा प्रसाद घेण्यासाठी जाताना घात; रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा मृत्यू

नांद्रा (जळगाव) : शेजारच्या गावात हरिनाम सप्ताह सुरु होता. या सप्ताहांतर्गत प्रसाद घेण्यासाठी दुसखेडा (ता. पाचोरा) गावातील काही नागरिक जात होते. मात्र प्रसाद घेण्यापूर्वीच काळाने घाला घातला. रेल्वे  रूळ ओलांडत असताना धावत्या रेल्वेखाली सापडून दोघांचा मृत्यू झाला. हि घटना रविवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. 

पाचोरा तालुक्यातील परधाडे येथे सुरू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रसादासाठी दुसखेडा येथील काही ग्रामस्थ व महिला भाविक रेल्वेमार्गाजवळून जात होते. दरम्यान दुसखेडा गावाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रत्नाबाई माधव पाटील (वय ५९) व अशोक झेंडू पाटील (वय ६०) यांना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

Mumbai News : वेळ लागला तरी चालेल, पण अन्याय व्हायला नको, अध्यक्ष लवकरच शेड्यूल जाहीर करणार; संजय शिरसाट यांची माहिती

सोबतच्या नागरिकांना धक्का 

प्रसादासाठी सोबत जात असताना दोघांच्या मृत्यूने सोबत जात असलेल्या नागरिकांना धक्का बसला. घटना गावात कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतातील अशोक पाटील हे मूळचे पहाण (ता. पाचोरा) येथील रहिवासी असून, कुरंगी शिवारातील शेती करण्यासाठी दोन वर्षांपासून ते दुसखेडा येथे वास्तव्यास होते. घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply