Pachora Crime News : एकाच रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडल्या; पाचोऱ्यातील घटना

Pachora Crime News : पाचोरा शहरातील त्र्यंबक नगर व कृष्णापुरी या गजबजलेल्या भागात पहाटेच्या सुमारास  मंदिरातील दानपेटी फोडल्याच्या घटना समीर आल्या आहेत. मंदिरातील दानपेट्या फोडून त्यातील रोकड व दागिने लांबविण्यात आले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पाचोरा  शहरातील त्र्यंबकनगर व कृष्णापुरी भागात असलेले रेणुका देवी मंदिर व महादेव मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या. यातील रेणुका मंदिराच्या दानपेटीतील सुमारे एक लाख ५० हजार रुपयांची रोकड व सोन्याचे दागिने, तसेच महादेव मंदिराच्या दानपेटीतील ८० हजार रुपयांची रोकड  चोरट्यांनी लांबविण्याचा अंदाज रहिवासी व भाविकांकडून व्यक्त करण्यात आला.

Uttar Pradesh News : दहशतवाद विरोधी पथकाला मोठे यश; आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या एजंटला अटक

मंदिरातील दानपेट्या चोरट्यानी फोडल्याची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. यानंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. चोरट्यांनी मंदिरे लक्ष केल्याने परिसरातील रहिवासी व भाविकांमध्ये भीती पसरली आहे



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *