Operation Sindoor : १-२ नाही तर ९० दहशतवादी मारले गेले, ऑपरेशन सिंदूरमुळे घाबरला पाकिस्तान

 

Operation Sindoor : अखेर भारताना पाकिस्तानला धडा शिकवला. भारतीय सैन्यांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्यांनी पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर लक्ष्य केले. ७ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता सुरक्षा दलांनी पीओके आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत ९० पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. मुरडिकेमध्ये ३० दहशतवादी मारले गेले. इतर छावण्यांमध्येही डझनभर दहशतवादी मारले गेल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भारताचे ऑपरेशन सिंदूर सक्सेस झाल्याचे म्हटले जात आहे.

पहलगाममध्ये झालेल्या नरसंहारानंतर दहशतवाद्यांना वाटले असेल की ते यावेळीही आपण पळून जाण्यात यशस्वी झालो. पण यावेळी भारतीय सैन्याने त्यांना नरकात पाठवलं. मंगळवारी रात्री ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतीय सैन्याने हवाई हल्ला केला आणि मुझफ्फराबादमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन दहशतवादी पहलगाममध्ये आले होते आणि त्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली होती. भारताने पाकिस्तानातील जे दहशतवादी तळ नष्ट केले या ठिकाणी लष्कर प्रमुख सईदचा मुलगा तल्हा सईद दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होता. तलहा सईद त्याच्या वरिष्ठ कमांडरांसह येथे बसायचा.

Operation Sindoor : मध्यरात्री 1.20 वाजता हल्ला, अजित डोभाल यांचा फोन आणि...; पाहा कसं केलं ऑपरेशन सिंदूरचं पूर्ण प्लॅनिंग?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या या हल्ल्यात तल्हा सईदचे सर्व टॉप कमांडर मारले गेले आहेत. संपूर्ण प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले आहे. हा हल्ला पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथे झाला. जिथून तल्हा सईदचे ऑपरेशन सुरू होते. भारताने केलेल्या हल्ल्यात दहशतवादी तळाच्या भिंती अक्षरश: रक्ताने माखल्या होत्या. सर्वत्र मृतदेह विखुरलेले दिसत होते.

या हल्ल्यात तल्हा सईदचे पाच टॉप कमांडर मारले गेले आहेत. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड अब्दुल रहमान देखील यामध्ये सहभागी असल्याचे बोलले जात आहे. छावणीत ठेवलेली सर्व शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळी तल्हा सईद तिथे उपस्थित होता की नाही हे अद्याप कळलेले नाही. महत्वाचे म्हणजे या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या दहशतवाद्यांची रुग्णालयांबाहेर मोठी रांग लागली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply