Operation Sindoor : पाकिस्तानात घुसून मारले, भारताचा मध्यरात्री एअर Strike, 9 दहशतवादी तळ उडवले

Operation Sindoor : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २६ निष्पाप पर्यटकांना जीव गेला. यानंतर आता भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारताने पाकिस्तानला आपली जागा दाखवून दिली आहे. भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केले आहे. भारताने पाकिस्तानमधील ९ दहशवादी तळांवर कारवाई केली आहे.

ऑपरेशन सिंदूर नक्की आहे तरी काय?

भारताने ७ मेच्या मध्यरात्री काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर स्ट्राइक केला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्यापत काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे.

Stray Dog : ८-१० मोकाट कुत्र्यांचा हल्ला, अंगाचे लचके तोडले, ७ वर्षाच्या चिमुकलीचा जागेवर मृत्यू

पहलगाममधील हल्ल्यानंतर १५ दिवसांतच बदला

दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर १५ दिवसांतच भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानवर मध्यरात्री एअर स्ट्राईक केले. यात ९ दहशतवादी हल्ले उडवून दिले. यात पाकव्यापत काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्ये हल्ला करण्यात आला आहे. पहलगाम हल्ल्यातील निष्पाण मृत व्यक्तींना आता न्याय मिळाला आहे, अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *