Onion Export Ban : कांदा लिलाव ठप्प; निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी रस्त्यावर

Onion Export Ban : केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविल्याने त्याचे तीव्र पडसाद  उमटू लागले आहेत. शेतकरी आक्रमक झाल्याने लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. तर चांदवड बाजार समितीतील कांदा लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला आहे. 

शेतकऱ्यांनी लागवड केलेला  कांदा काढणीस सुरवात झाली आहे. यामुळे सध्या नविन लाल कांद्याला ३ हजाराच्या दरम्यान भाव मिळत होता. कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णया घेतल्याने त्याचा परिणाम  शेतकरी व व्यापाऱ्यांना बसणार आहे. तर सद्यपरिस्थितीला आवक कमी असल्याने सध्या दरात तेजी असली तरी पुढील काही दिवसात आवक वाढणार असल्याने भाव कमी होतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Ravikant Tupkar : सरकारने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, अन्यथा... रविकांत तुपकरांचा थेट इशारा

संतप्त शेतकऱ्यांचा रास्ता रोको 

कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी कांदा लिलाव बंद पाडत शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या दरम्यान चांदवड बाजार समितीचे लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडले. तर दुसरीकडे शेतकरी रस्त्यावर उतरत सरकारचा निषेध करत कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ उठवावी अशी मागणी केली आहे. या दरम्यान मुंबई- आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच येवला - नांदगाव रस्त्यावरील बाजार समिती समोर शेतकऱ्यांनी रास्ता रोखला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply