Odisha Train Accident News : ओडिशा ट्रेन अपघातातील मृतांचा आकडा 233 वर, 900 हून अधिक प्रवासी जखमी

Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजून 51 मिनिटांना एक भीषण रेल्वे अपघात झाला. बहनागा स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. टक्कर इतकी जोरदार होती की कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरली.

कोरोमंडल एक्स्प्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. मिळालेल्या माहितीनुसार सात डबे उलटले, चार डबे रेल्वे हद्दीबाहेर गेले. एकूण 15 डब्बेर रुळावरून घसरले आहेत. या वेदनादायक अपघातात आतापर्यंत 233 प्रवाशांच्या मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक जण जखमी आहेत. घटनास्थळावर रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरु आहे.

ओडिशामध्ये एक दिवसीय दुखवटा जाहीर

ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने माहिती दिली की, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसीय राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण किंवा उत्सव साजरा होणार नाही. 

अपघातानंतर या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द

ओडिशामधील रेल्वे अपघातानंतर या मार्गावरील सर्व ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. मदत आणि बचावकार्य वेगाने राबवले जात आहे. अपघाताच्या ठिकाणी स्थानिक प्रशासन कार्यरत आहे. एनडीआरएफ पथकांकडून बचावकार्य सुरू आहे.

मदतीसाठी 50 रुग्णवाहिका आहेत. जखमींचा आकडा वाढत आहे. त्यामुळे काही जखमींना बसमधून रुग्णालयात पोहोचवण्यात येत आहे, अशी माहिती ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply