Odisha Train Accident : तीन दिवस उलटले, अजूनही पटली नाही १०० मृतदेहांची ओळख; नातेवाईकांचा शोध सुरूच

Odisha Train Accident : ओडिसाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघाताला तीन दिवस उलटून गेले आहेत. देशाला हादरवून सोडणाऱ्या या अपघातानंतर वेगाने बचावकार्य सुरू करण्यात आलं. मात्र अपघाताच्या तीन दिवसानंतर देखील १०० मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाहीये. हे मृतदेह भुवनेश्वर येथील AIIMS, कॅपिटल हॉस्पिटल आणि इतर चार रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत.

यासंबंधी माहिती देताना मुख्य सचिव प्रदीप कुमार जेना यांनी सोमवारी सांगितलं की, राज्य सरकारने आतापर्यंत २७५ लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. तसेच रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत १८० मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आम्ही ८५ मृतदेह बालासोर आणि ९५ मृतदेह भुवनेश्वर येथे पोहचवले असे त्यांनी सांगितलं.

मृतदेहांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून राज्य सरकार भुवनेश्वर येथील शवागरातून ते मूळ गावी मृतदेह पोहचवण्याचा खर्च उचलाणार आहे, असेही त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, आमचे अधिकारी मृतदेहांची ओळख पटवण्यापासून ते त्यांच्या घरी सुपूर्द करण्यापर्यंत सर्व गोष्टींसाठी समन्वय साधत आहेत. तसेच सरकार मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र डिजीटल तसेच फिजीकल कॉपी देखील स्पीड पोस्टाने घरपोच पाठवणार आहे

त्यांना या कागदपत्रांबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही कमीत कमी कालावधीत सोप्या प्रक्रियेने ते पोहचवू. नातेवाईक हेल्पलाइन नंबरवर कॉल करू शकतात आणि सरकारी अधिकारी त्यांना येथे कसे पोहोचायचे याचे मार्गदर्शन करतील असंही त्यांनी सांगितलं

नातेवाईकांचा शोध सुरूच..

कोणाचाही फोटो जुळून आल्यास नातेवाईक शवागारात जाऊन खातरजमा करू शकतात. यादरम्यान, अनेक जणांना अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे मृतदेह सापडत नाहीयेत. लोक शोध घेत रुग्णालयात फिरत असून मृतदेह मिळत नसल्याने हतबल झाले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply