OBC Reservation News : तब्बल २१ दिवसानंतर ओबीसींचं उपोषण मागे; सरकार मागण्या पूर्ण करणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

OBC Reservation News : मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करू नका, ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नका, अशा विविध मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी चंद्रपुरात उपोषण सुरू केलं होतं. तब्बल २१ दिवसांपासून टोंगे यांचं उपोषण उपोषण सुरू होतं. आज देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. 

राज्य सरकारने मागण्या मान्य केल्याबद्दल ओबीसी संघटनेने राज्य सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको, अशी भूमिका मांडत रवींद्र टोंगे यांच्यासह तिघांनी चंद्रपुरात अन्नत्याग उपोषण सुरू केलं होतं. आज या उपोषणाचा २१ वा दिवस होता.

अन्न तसेच पाण्याचा त्याग केल्याने दोन तीन दिवसांपासून टोंगे यांची प्रकृती खालावली होती. राज्य सरकार ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार समाजबांधवांनी जाहीर केला होता. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला विविध मागण्यांबाबत आश्वस्त करत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

या विनंतीला प्रतिसाद देत रवींद्र टोंगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. फडणवीसांच्या हातून सरबत घेऊन टोंगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. याप्रसंगी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे उपस्थित होते. दरम्यान, शुक्रवारी ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुंबईत एक बैठक झाली.

Maratha Reservation : 'मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देणार नाही', मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

यावेळी शिंदे यांनी ओबीसींच्या सर्व मागण्या मान्य केल्या. तसेच ओबीसींच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करणार नाही, असं आश्वासन देखील दिलं. त्याचबरोबर सर्वच मराठ्यांना आम्ही कुणबी प्रमाणपत्र देणार नाही, असं देखील शिंदे यांनी ओबीसी नेत्यांना सांगितलं. त्यामुळेच आज टोंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply