स्टॅव्हंगर (नॉर्वे) : नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची विजयाची हॅट्ट्रिक

स्टॅव्हंगर (नॉर्वे) : भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने नॉर्वे स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना पारंपरिक (क्लासिकल) विभागातील तिसऱ्या फेरीत चीनच्या वांग हाओवर मात केली. पाच वेळा विश्वविजेत्या आनंदचा हा सलग तिसरा विजय ठरला.

५२ वर्षीय आनंदने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अनुक्रमे मॅक्सिम वाशिये-लॅग्रेव्ह आणि व्हेसेलिन टोपालोव्ह यांचा पराभव केला होता. त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री झालेली आनंद आणि हाओ यांच्यातील तिसऱ्या फेरीची नियमित लढत ३९ चालींअंती बरोबरीत संपली. मग अर्मागेडन डावात आनंदने ४४ चालींमध्ये सरशी साधताना सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. या कामगिरीसह आनंदने गुणतालिकेतील अग्रस्थान कायम ठेवले. त्याच्या खात्यावर ७.५ गुण आहेत. अमेरिकेचा ग्रँडमास्टर वेस्ली सो (६ गुण) आणि नॉर्वेचा जगज्जेता मॅग्नस कार्लसन (५.५ गुण) गुणतालिकेत अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply