Tax Free Income: जेव्हा आपण उत्पन्न अथवा कमाईची चर्चा करतो, तेव्हा सर्वात अगोदर विचार येतो तो आयकराचा येतो. मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या उत्पन्नातील एक मोठा वाटा हा करासाठी द्यावा लागतो. कारण कायद्यातच तशी तरतूद आहे. पण कायद्यातील काही तरतूदींमुळे काही उत्पन्नावर नागरिकांना आयकर द्यावा लागत नाही. आयकर विभाग (Income Tax Department) ही कमाई ‘टॅक्स-फ्री’ श्रेणीत ठेवते. जर तुम्ही या स्त्रोताच्या माध्यमातून कमाई करत असाल तर तुम्हाला कर भरावा लागत नाही.
शेतीच्या उत्पन्नावर नाही आयकर
करमुक्त उत्पन्नात कृषी उत्पन्न (Agricultural Income) सर्वात पुढे आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर द्यावा लागत नाही. तर तुम्हाला जर आई-वडिलांकडून संपत्ती (Inheritance) मिळाली. तर त्यावरही कोणताच कर द्यावा लागत नाही. पण ही संपत्ती विक्री केली अथवा त्यातून काही फायदा झाला तर त्यावर कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो. लग्न वा इतर मंगल प्रसंगी नातेवाईक, मित्रांकडून ज्या भेटवस्तू (Gifts) मिळतात, त्यावर कर द्यावा लागत नाही. पण त्यासाठी काही नियम व अटी आहेत.
या कमाईवर नाही लागत टॅक्स
१. शेतीतून होणारी कमाई करमुक्त आहे. पण जर ही कमाई 5000 रुपयांहून अधिक असेल आणि इतर उत्पन्नापेक्षा जास्त असेल तर आयकर गणनेत ती जोडल्या जाऊ शकते.
२.पब्लिक प्रोव्हिडंड फंड (PPF) मधील गुंतवणुकीवरील व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे टॅक्स फ्री असते. यामध्ये वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुकीवर कलम 80C चा लाभ मिळतो.
३.EPF रक्कम काढताना जर तुम्ही 5 वर्षांची नोकरी पूर्ण केली असेल तर संपूर्ण रक्कम काढण्यावर कोणताही कर द्यावा लागत नाही.
४.विमा योजनेत, जर विमाधारकाचा मृत्यू झाला तर क्लेम टॅक्स फ्री असतो. पण त्यासाठी सम एश्योर्डची रक्कम 10 टक्क्यांपेक्षा अधिक नसावी अशी अट आहे.
५.तर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीवर कोणताही आयकर लागत नाही
६.नातेवाईक, मित्रांकडून मिळणाऱ्या भेट वस्तूवर कर द्यावा लागत नाही. तर इतरांकडून मिळालेल्या 50,000 रुपयांपर्यंतच्या भेटीवर कोणताही कर द्यावा लागत नाही. त्यावरील रक्कमेवर मात्र कर द्यावा लागतो.
७.वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीवर कोणताही कर द्यावा लागत नाही. पण या संपत्तीतून जर कमाई होत असेल तर मात्र त्यावर कर द्यावा लागतो.
८.सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही खास मुलींसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. यावरील व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम दोन्ही कर मुक्त असतात.
९.सरकारकडून जारी विशेष टॅक्स फ्री बाँड्मधून जे व्याज मिळते त्यावर आयकर लागत नाही.
१०.तर सरकारी कर्मचार्यांना देण्यात येणारी ग्रॅज्युएटी कर मुक्त असते. तर खासगी कर्मचाऱ्यांसाठी ही मर्यादा 20 लाख रुपयांपर्यंत आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


