Team India : न्यूयॉर्कमध्ये टीम इंडियासमोर नवे संकट; BCCIनं उचललं मोठं पाऊल

No GYM Facility for Team India in New York Hotel : टीम इंडिया सध्या टी-20 वर्ल्ड कप 2024खेळण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये आहे. भारतीय संघाने येथे दोन सामने खेळले असून दोन्ही सामने जिंकले आहेत. दरम्यान, भारतीय संघासमोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये मुक्कामाला आहे, तिथे जिमची चांगली सोय नाही. याच कारणामुळे बीसीसीआयने आता मोठ पाऊल उचललं आहे.

न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी नवीन स्टेडियमही तयार करण्यात आले असून जगभरातील अनेक संघ सध्या न्यूयॉर्कमध्ये आहेत.मात्र, आतापर्यंत कोणत्याही संघाचा अनुभव चांगला राहिला नाही. श्रीलंकेने यापूर्वी प्रवासाबाबत तक्रार केली होती की त्याना स्टेडियमपासून दूर ठेवण्यात आले होते. तर पाकिस्तानलाही आपले हॉटेल बदलावे लागल्याचे वृत्त आहे.

Aus Vs Nam T20 World Cup : फक्त 34 चेंडूत ऑस्ट्रेलियाने 'या' संघाला पाजलं पाणी; अन् थाटात मारली सुपर-8 एंट्री

 


आता भारतीय संघालाही अडचणींचा सामना करावा लागला आहे. न्यूज 18 च्या बातमीनुसार, टीम इंडिया ज्या हॉटेलमध्ये थांबली आहे त्या हॉटेलमधील जिमची सुविधा खूपच खराब आहे. या कारणास्तव बीसीसीआयने हॉटेलजवळील जिमची मेंबरशिप घेतली.

मात्र, टीम इंडियाला आता न्यूयॉर्कमध्ये जास्त काळ थांबण्याची गरज नाही. न्यू यॉर्कमध्ये भारताचा शेवटचा सामना 12 जून रोजी म्हणजे आजच अमेरिकेविरुद्ध होणार आहे. यानंतर ते ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना खेळण्यासाठी फ्लोरिडाला जातील, जिथे त्यांचा सामना 15 जून रोजी कॅनडाशी होईल.

टीम इंडियाला अमेरिकेला पराभूत करून सुपर-8 मध्ये स्थान मिळवायचे आहे. भारताला आता पुढच्या फेरीत जाण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. जर संघाने यजमान अमेरिकेला पराभूत केले तर सुपर-8 मध्ये स्थान निचित होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply