Nitish Kumar : सत्ता हवी तर भाजपला पूर्ण कराव्या लागतील नितीश कुमार यांच्या या ४ मागण्या

Nitish Kumar : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यावेळी भाजप बहुमतापासून थोडक्यात हुकली आहे. या निकालानंतर नितीश कुमार हे किंगमेकरच्या भूमिकेत आले आहेत. यातच नितीश कुमार हे बिहारच्या विकासाच्या अजेंड्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोरदार सौदेबाजी करण्याच्या मनस्थितीत असल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चार मोठ्या मागण्या केल्या आहेत. यात बिहारला विशेष राज्याचा दर्जा, अधिक मंत्री पदे, राज्याला अधिक निधी आणि बिहारमध्ये लवकर विधानसभा निवडणूक घेण्यात यावी, या मागण्याचा समावेश आहे.

PM Narendra Modi : लोकसभा निकालानंतर महायुतीची खलबतं; विधानसभेत चुका सुधारून एकत्रित काम करा, PM मोदींनी दिले निर्देश

सध्या नितीश कुमार बिहारमध्ये मजबूत स्थितीत असल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. भाजप, जेडीयू, एलजेपी (आरव्ही) आणि एचएएमने मिळून 30 जागा जिंकल्या आहेत. नितीश कुमार यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या जेडीयू नेत्याने सांगितले की, “बिहारमधील मतदारांमध्ये जेडीयू आणि एनडीएसाठी अनुकूल वातावरणाचा फायदा घेण्यासाठी सहा महिन्यांत लवकर निवडणुका घेण्याबाबत आम्ही विचार करत आहोत."

दरम्यान, सध्याच्या राज्य विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबर 2025 मध्ये संपणार आहे. बिहारमधील शेवटच्या विधानसभा निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये झाल्या होत्या. ज्यामध्ये जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या, तर भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या.

ज्येष्ठ जेडीयू नेते केसी त्यागी यांनी मंगळवारी सांगितले की, पक्ष केंद्राकडून बिहारला विशेष दर्जा देण्याची मागणी करत आहे आणि ही मागणी पक्ष आता अधिक जोर देऊन करत आहे. कारण आता जेडीयू केंद्र सरकारमध्ये प्रमुख भागीदार आहे. बिहारला विशेष दर्जा मिळावा अशी आमची इच्छा असून त्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply