Nitin Desai Case Updates : नितीन देसाई मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार

Nitin Desai Case Updates: प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई आत्महत्या प्रकरणात खालापूर पोलिसांनी राजकुमार बन्सल यांच्यासह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी आरोपींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज याचिकेवर सुनावणी झाली असून आरोपींना कोणताही तातडीचा दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

त्याचबरोबर हायकोर्टाने येत्या १८ ऑगस्टपासून याप्रकरणाची सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. अटकेपासून दिलासा द्यायचा की नाही? हे पुढील सुनावणीला ठरवू, असंही हायकोर्टाने आजच्या सुनावणी सांगितलं आहे. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी निराशेतून काही दिवसांपुर्वीच आत्महत्या केली होती.

त्यांनी अचानकपणे टोकाचं पाऊल उचलल्याने यावरून अनेकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. नितीन देसाई यांच्यावर २५० कोटींच कर्ज असल्याने तर ज्यांनी कर्ज दिले त्यांनी दबाव टाकल्यानेच देसाई यांनी आत्महत्येचं पाऊल उचल्याचे बोलले जात आहे.

Pune : पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग चारचाकीवर कोसळला; येरवडा भागातील घटना

देसाई यांच्या कुटुंबाने देखील त्यावरून आरोप केले आहेत. दरम्यान, नितीने देसाई यांच्या पत्नी नेहा यांच्या फिर्यादीवरून खालापूर पोलिसांनी कर्ज कंपनी ईसीएल फायनान्स आणि एडलवाईससह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी पाचही जणांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं.

तब्बल ६ ते ७ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी आरोपींची सुटका केली होती. दरम्यान, एडलवाईसचे संचालक रासेश शाह यांनी या प्रकरणात तातडीने दिलासा मिळावा, तसेच आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करावा, यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. आज हायकोर्टात यावर सुनावणी झाली असून कोर्टाने कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply