Nirmala Sitharaman Budget Saree : निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं लक्ष, पांढऱ्या सोनेरी बॉर्डरच्या साडीचं आहे बिहार कनेक्शन

Nirmala Sitharaman Budget Saree :अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग आठव्यांदा देशाचे अर्थसंकल्प सादर करीत आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्य काळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करण्यासोबत अर्थमंत्री यांच्या साडीचीही तितकीच चर्चा होते. अर्थमंत्री यांच्या साड्या भारताच्या विविध संस्कृतीचे प्रतिनिधीत्व करतात.

यंदाचे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्यांनी आपल्या बजेट टीमसोबत औपचारिक फोटोसेशन केले आहे. यावेळी त्यांनी पारंपारिक क्रीम रंगाची मधुबनी मोटीफ साडी परिधान केली आहे. या साडीला गोल्डन बॉर्डर आहे. तसेच मिथिलाची चित्रे साडीत तयार करण्यात आली आहेत. ही साडी अर्थमंत्र्यांनी गडद लाल रंगाच्या ब्लाऊजसोबत नेसली आहे. ही साडी सुबक पारंपारिक दिसत आहे. ही साडी नेसून निर्मला केवळ फॅशन स्टेटमेंटच देत नाहीत तर, भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रचार करीत आहेत.

Mega Block : रविवारी हार्बर मार्गावर प्रवाशांसाठी दिलासा, मात्र मध्य रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक

पद्मश्री पुरस्कार विजेती दुलारी देवी यांनी अर्थमंत्र्यांना ही साडी भेट म्हणून दिली होती. अर्थमंत्री सीतारामन मधुबनीतील मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची भेट घेतली. त्यानंतर दुलारी देवीने त्यांना एक साडी भेट म्हणून दिली. तसेच अर्थमंत्र्यांना बजेटच्या दिवशी भेट म्हणून दिलेली साडी नेसण्याची विनंती केली. निर्मला सीतारामन यांनी दुलारी देवीची विनंती स्वीकारली. त्यांनी बजेट सादर करण्यासाठी तीच साडी नेसली आहे.

दुलारी देवी मिथिला आर्ट्ससाठी ओळखल्या जातात. २०२१ मध्ये त्यांना भारत सरकारने कलेतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्तकाराने सन्मानित केले. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी नेसली होती. राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही साडी आहे. या साडीची तेव्हा खूप चर्चा झाली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply