Nilesh Rane Retirement : निलेश राणेंचा राजीनामा स्थान बळकट करण्यासाठी?

Nilesh Rane Retirement : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा ज्येष्ठ पुत्र ,माजी खासदार निलेश राणे यांनी अचानक दिलेला राजीनामा हा त्यांच्या कुटुंबासाठीही धक्का आहे असे समजते. निलेश राणे या वेळी लोकसभेच्या रणाऐवजी विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याचा विचार करत होते ,मात्र घराणेशाहीच्या विरोधात भाजपच्या एका नेत्याने विधान केल्याने नाराज झालेल्या निलेश यांनी हे पाऊल उचलले आहे काय हे चाचपडून पाहिले जाते आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळातील एका नेत्याच्या मुलाने राजीनामा देणे हे टोकाचे पाऊल मानले जाते आहे. गेले काही दिवस निलेश कमालीची मेहनत करत होते. विशिष्ट मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडावा याबाबत भाजप शिंदेसेनेची प्रारंभिक चर्चाही सुरु होती. त्या विषयाला बगल मिळू नये यासाठीचे हे पाऊल आहे असेही समजते.

Shahapur Bus Accident : दसरा मेळाव्याहून परतणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसैनिकांच्या तीन बसचा भीषण अपघात, 25 जण जखमी

जिल्हाध्यक्षपदावर राणे कुटुंबाने सांगितलेली व्यक्ती नेमली गेली नव्हती. नारायण राणे यांनी ही परिस्थिती समजून घेतली, नितेश राणे यांनी तर सध्या आघाडी घेत ठाकरे परिवाराच्या शिवसेनेवर टीकास्त्र सोडणे सुरु ठेवले आहे. भावाभावांची कार्यपध्दत वेगळी असतानाच निलेश यांनी हा धक्का दिला.

त्यांच्या काही समर्थक कार्यकर्त्यांनी लगेचच राजीनामे देत त्यांना दिलेला पाठिंबा हाही चर्चेचा विषय होता. परस्पर धक्के देत हा निर्णय निलेश कुठवर रेटतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी वारंवार पराभव स्वीकारावा लागल्याने निलेश यांनी हा सूर लावला असल्याची तक्रार केली आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply