Thirty First : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ॲक्शन मोडवर; राज्यात अशी राहणार नाकाबंदी, हुल्लडबाजांवर होणार कारवाई

News Year Celebration : नववर्षानिमित्ताने ठिकठिकाणी पार्टीचे नियोजन करण्यात आलेले असते. रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स, ढाब्यांवर पार्टी करत सेलिब्रेशन करण्यात येत असते. मात्र असे करताना काहीजण हुल्लडबाजी करत गोंधळ घालत असतात. अशा हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून पोलिसांचे पथक देखील ठिकठिकाणी तैनात राहणार आहे. नाकाबंदी करत हुल्लडबाजांवर कारवाई करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यात ३५ ठिकाणी नाकाबंदी

नववर्षाचे स्वागत शांततेने करा, कायद्याचं पालन करत स्वागत करण्याच्या अनुषंगाने जळगावात ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलीस दल सज्ज झाला आहे. यासाठी जिल्ह्यात ३५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येऊन वाहनांची तसेच वाहनधारकांची तपासणी केली जाणार आहे. याकरिता ८०० पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तसेच दीडशे पेक्षा जास्त पोलीस अधिकारी बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे. तसेच ब्रेक अनालायझरच्या माध्यमातून ड्रंक अँड ड्राईव्हची तपासणी केली जाणार असून तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

खासगी जागा मालकांना नोटीस तसेच खाजगी ठिकाणी पार्टीचे आयोजन करण्याची जबाबदारी संबंधित जागा मालकाची राहणार असून त्याबाबत त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. तर खाजगी ठिकाणी पार्टी दरम्यान मर्यादेपेक्षा जास्त आवाज तसेच कुठलाही गैरप्रकार आढळून आल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जागा मलकाची तसेच हॉटेल मालकाची राहणार असल्याची तंबी देण्यात आली आहे

वर्धा जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी

वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असल्याने इतर जिल्ह्यातून दारू वाहतूक तसेच मद्यपान करुन येत अपघात किंवा गुन्हा होण्याची शक्यता असल्यानं पोलीस अलर्ट आहेत. याकरिता शंभर पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी बंदोबस्तात असणार आहे. सेलिब्रेशन चांगल्या पद्धतीनं होईल, यासाठी प्रशासन काळजी घेत आहे. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. असामाजिक तत्वांवर विशेष लक्ष असल्याचं पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सांगितले. तर असामाजिक तत्वांकडून त्रास झाल्यास पोलिसांशी संपर्क करावा; असे आवाहन केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात ५० ठिकाणी नाकाबंदी कोल्हापूर : थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनचा अनुषंगाने सर्वत्र पार्ट्या असणार आहेत. यामुळे ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यात ५० ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत असून प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ अनालायझरची व्यवस्था आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी घातपात विरोधी पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना कायद्याचं पालन करावे; असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

नागपूरमध्ये ५५ लाखाचे ड्रग्स जप्त नागपूर : नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी विविध हॉटेल्समध्ये पार्टी असून त्या ठिकाणी एमडी ड्रगची मागणी लक्षात घेऊन मोठी खेप नागपुरात आली होती. नागपुरात आलेले ५५ लाख रुपयाचे ड्रग्स जप्त करण्यात आले. राजस्थानमधून मध्यप्रदेश मार्गे ड्रग नागपुरात आणण्यात आले होते.कुख्यात गुंड सुमित रमेश चिंतलवार आणि त्याच्या साथीदारांना सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. यातील सुमित चिंतलवार पाच महिन्यापूर्वीच जामीनवर बाहेर आला होता.

अहिल्यानगरमध्ये मोठा फौजफाटा

अहिल्यानगर : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या हॉटेल, रिसॉर्ट आणि पर्यटनस्थळ, धार्मिक स्थळांवर नागरिक गर्दी करताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला अनुचित प्रकार घडू नये; म्हणून अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दोन अप्पर पोलीस अधीक्षक, आठ पोलीस उपाधीक्षक, ३० पोलीस निरीक्षक, ४० सहाय्यक पोलीस निरीक्षक, ८५ पीएसआय, १९५० पोलीस कर्मचारी क्यू आर टीचे दोन पथक तसेच आरसीबीचे तीन पथके, स्ट्रायकींग फोर्स आणि होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. चेक नाके लावून ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अहिल्यानगर जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली आहे.

नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येला कडेकोट बंदोबस्त

ठाणे : नववर्ष स्वागता निमित्ताने ठाणे पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यावेळी पोलिसांकडून विशेष मोहीमा राबविल्या जात आहेत. शहरातील हॉटेल, ढाबे, लॉन्समध्ये गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी गस्त घालत आहेत. खाडी किनारे, जेट्टी भागातही साध्या वेशातील पोलीस तैनात असतील. ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात विविध हाॅटेल, ढाबे, लाॅन्समध्ये ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीला पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या कालावधीत शांतता राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. त्यानुसार, गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहतुक पोलिसांकडून देखील शहरात तपासणी केली जाणार आहे. मद्य सेवन करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर श्वास विश्लेषक यंत्राद्वारे कारवाई केली जाईल. ठाणे पोलिसांकडे ४१ श्वास विश्लेषक यंत्र आहेत.

बंदोबस्त असा असेल सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन अपर पोलीस आयुक्त, आठ उपायुक्त, १६ साहाय्यक पोलीस आयुक्त, ११८ पोलीस निरीक्षक, ३१५ साहाय्यक पोलीस निरीक्षक णि उपनिरीक्षक, २ हजार २५३ पोलीस अंमलदार, ३७८ महिला पोलीस अंमलदार, राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन तुकड्या असा पोलिसांचा बंदोबस्त असेल.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply