New Sansad Bhavan : नवं 'संसद भवन' लवकरच सेवेत! २८ मे रोजी PM मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित झाली असून येत्या २८ मे रोजी नव्या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी याची अधिकृत घोषणा केली. 'सेन्ट्रल व्हिस्टा' विकास प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेली नव्या 'संसद भवन'ची इमारत सर्व सुविधांनी सज्ज आहे. 

विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याचं निमंत्रण दिलं. नव्या संसद भवनाचं बांधकाम पूर्ण झालं असून ही इमारत आत्मनिर्भर भारताचं प्रतिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवी दिल्लीतील सेन्ट्रल व्हिस्टा विकास प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची इमारत उभारण्यात आली आहे. ६४,५०० स्वेअर मीटर जागेवर ही चार मजली इमारत उभारण्यात आली आहे. या नव्या इमारतीत १,२२४ खासदार बसू शकतात. यांपैकी लोकसभेच्या सभागृहातची ८८८ सीटची क्षमता आहे. तर राज्यसभेच्या सभागृहात ३८४ खासदार बसू शकतात.

त्रिकोणी आकाराच्या या नव्या संसद भवनाच्या इमारतीच्या बांधकामाला १५ जानेवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली होती, जे ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण होणार होतं. पण या काळात कोरोनाचा उद्रेक झाल्यानं आणि संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये असल्यानं याच्या कामाला उशीर झाला.

काय आहेत वैशिष्ट्ये?

नव्या संसद भवनासाठी ९७० कोटी रुपये खर्च आला असून या इमारतीत प्रवेशासाठी तीन मार्ग आहेत. या मार्गांना ग्यान द्वार, शक्ती द्वार आणि कर्म द्वार अशी नावं देण्यात आली आहेत. तसेच खासदार, व्हीआयपी आणि व्हिजिटर्सना प्रवेशासाठी यामध्ये स्वतंत्र मार्ग आहेत. या इमारतीत एक कॉन्टिट्युशन हॉल असणार आहे. यामध्ये देशाच्या लोकशाहीच्या वारशाची माहिती असणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply