New PMC Commissioner : पुणे महापालिका आयुक्तपदी राजेंद्र भोसले यांची नियुक्ती

New PMC Commissioner : पुण्यातून मोठी बातमी हाती आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातही मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहे. याचदरम्यान, पुणे महापालिका आयुक्तपदावरून विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे. यानंतर या पदी राजेंद्र भोसले नियुक्ती करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बदलीचे आदेश दिले. त्यांनंतर मुंबईच्या 'एमएमआरडीए' अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलं आहे. विक्रम कुमार यांच्या जागी राजेंद्र भोसले यांची नवे पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. तर विक्रम कुमार यांची मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Crime News : जानकी रामनगर परिसरात धाडसी चाेरी, साेने, चांदीसह लाखाेंची रक्कम पळवली; आझाद नगर पाेलिसांचा तपास सुरु

विक्रम कुमार यांनी तीन वर्षांहून अधिक वेळ महापालिका आयुक्त म्हणून काम पाहिलं. गुरुवारी त्यांना पुणे महापालिकेचे प्रशासक म्हणून दोन वर्ष पूर्ण केले. गेल्या काही दिवसांपासून विक्रम कुमार यांच्या बदलीची जोरदार चर्चा होती. विक्रम कुमार यांनी गेल्या आठवड्यात पालिकेचे साडेअकरा हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले होते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची राज्याचे क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारीपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली करण्यात आली आहे. त्यांना होमगार्डचे महासमादेशकपदी बढती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply