New Parliament Inauguration : नव्या संसदेच्या उद्घाटनासाठी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त; दिल्लीच्या सर्व सीमा केल्या सील

New Parliament Inauguration : राजधानी दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. संसद भवनाच्या आजूबाजूचे सर्व रस्ते सर्वसामान्यांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहतूक पोलिसांकडून सर्वसामान्यांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. 

आजच्या या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल आणि पॅरा मिलिटरीही तैनात करण्यात आले असून, यावेळी महिला पोलिसांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, आज (28 मे रोजी) संसदेजवळ महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीत निमलष्करी दलाच्या 20पेक्षा जास्त तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये10 पेक्षा जास्त महिलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संसदेजवळील मेट्रो स्टेशनही बंद राहणार आहेत. 28 मे रोजी नवीन संसदेच्या उद्घाटनावेळी दोन मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यासाठी दिल्ली मेट्रोला आधीच पत्र देण्यात आलं होतं.

या कार्यक्रमानिमित्त सिंघू बॉर्डर, दिलशाद गार्डन बॉर्डर, बदरपूर बॉर्डर आणि टिकरी बॉर्डर येथे बॅरिकेडिंग करण्यात येणार असून पोलीस तसेच निमलष्करी दलाचे जवानही त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *