New Delhi : केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच मातृत्व रजा घेण्याचा अधिकार आहे का, अशी विचारणा करीत अधिनियमातील तरतुदीबाबत तीन आठवड्यांत योग्य ते कारण स्पष्ट करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले. सर्वोच्च न्यायालयात मातृत्व लाभ अधिनियम १९६१ च्या तरतुदीला आव्हान देणारी जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. या तरतुदीनुसार केवळ तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच १२ आठवड्यांची मातृत्व रजा प्राप्त करण्याचा अधिकार आहे. या प्रकरणावर न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. पंकज मिथल यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान संबंधित तरतूद सामाजिक कल्याण कायदा असून यात मुलाचे वय तीन महिन्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याबाबत कोणतेही वर्गीकरण केले नसल्याचे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात जर एखादी महिला तीन महिन्यांपेक्षा अधिक वयाचे मूल दत्तक घेत असेल तर ते दुरुस्ती अधिनियमाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही मातृत्व रजेचा लाभ घेण्यास पात्र ठरणार नाही, असे स्पष्ट केले होते.
याचिकाकर्त्यांना उत्तराची प्रत देण्याचे निर्देश
दरम्यान, केंद्र सरकारकडून देण्यात येणारी उत्तराची एक प्रत याचिकाकर्त्याच्या वकिलांनाही देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणावर आता १७ डिसेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मातृत्व लाभ अधिनियम १९६१मधील कलम ५ (४) हा भेदभाव करणारा व मनमानी असल्याच्या आरोपावरून केंद्राकडे उत्तर मागितले होते.
|
|
केंद्र सरकारने तीन महिने वयाचे वर्गीकरण योग्य ठरवीत उत्तर सादर केले आहे. तथापि, सुनावणीदरम्यान अनेक मुद्दे समोर आले असून त्यावर विचार करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून योग्य उत्तराची अपेक्षा आहे. तीन महिन्यांपेक्षा कमी वयाचे मूल दत्तक घेणाऱ्या महिलेलाच मातृत्व रजेचा अधिकार आहे की नाही, हा मुद्दा स्पष्ट व्हायला हवा.
याचिकेत काय…
‘कलम ५(४) हे मूल दत्तक घेणाऱ्या मातांविरुद्ध भेदभावपूर्ण आणि मनमानी असण्याव्यतिरिक्त, तीन महिन्यांपेक्षा जास्त वयाच्या अनाथ, परित्यक्त किंवा आत्मसमर्पण केलेल्या मुलांशीदेखील भेदभाव करते, जे मातृत्व लाभ कायद्याचे तसेच बाल न्याय कायद्याशी पूर्णपणे विसंगत आहे. मूल दत्तक घेतलेल्या मातांना १२ आठवड्यांचा मातृत्व लाभ हा केवळ ‘दिखाऊपणा’ नाही, तर जैविक मातांना प्रदान केलेल्या २६ आठवड्यांच्या प्रसूतीच्या फायद्यासोबत मूर्खपणाची तुलनादेखील आहे.
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र

- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel