Patanjali Apology : पतंजलीच्या माफीनाम्यात सुधारणा!

New Delhi : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल माफीनाम्यामध्ये ‘पतंजली आयुर्वेद’ने आपले सहसंस्थापक रामदेवबाबा यांच्या नावाचा उल्लेख केल्याची दखल आज सर्वोच्च न्यायालयाने घेतली. यासंदर्भात लक्षणीय प्रगती झाली आहे.

यापूर्वी केवळ पतंजली असा उल्लेख होत होता. आता त्यात नावे आहेत, आम्ही हे स्वीकारतो. असे न्यायाधीश हिमा कोहली आणि न्या. अहसनुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने पंतजलीचा माफीनामा तपासल्यानंतर सांगितले.

CSK Vs PBKS IPL 2024 : प्ले-ऑफसाठी रस्सीखेच! चेन्नईशी आज भिडणार पंजाब; कोण मारणार बाजी?

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष आर. व्ही. अशोकन यांनी केलेल्या टिपण्यांबद्दलही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. पतंजलीची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर ही मुलाखत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाने आयएमए आणि खासगी डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर टीका करणे, दुर्देवी असल्याची टिपणी अशोकन यांनी केली होती. तुम्ही एक बोट पतंजलीकडे दाखविता तेव्हा चार बोटे आयएमएकडे निर्देश करतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.

निष्क्रियतेबद्दल ताशेरे

पतंजली आयुर्वेद लि.च्या जाहिरात प्रकरणातील निष्क्रियतेबद्दल उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. ‘तुम्हाला सहानुभूती हवी असेल तर प्रामाणिक राहा’, असेही न्यायालयाने प्राधिकरणाला सुनावले. प्राधिकरणाच्या स्पष्टीकरणावर न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply