NEET परीक्षेआधीच विद्यार्थ्यानं आयुष्याचा दोर कापला, घरात गळफास घेऊन संपवलं आयुष्य, बीडमध्ये हळहळ

 

NEET : परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने परीक्षा होण्यापूर्वीच आपल्या आयुष्याचा दोर कापला आहे. लातूरमधील राहत्या खोलीतच त्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी गेले अनेक वर्ष कोचिंग क्लासमध्ये NEET परिक्षेची तयारी करत होता. मागच्या वेळी त्याला ५२० गुण मिळाले होते. मात्र तरीही त्याला वैद्यकीय प्रवेश मिळाला नव्हता. यंदाही तो NEET परिक्षेची तयारी करत होता. पण परिक्षेच्या १ दिवस आधीच त्याने राहत्या खोलीत आत्महत्या केली. तरूणाने आत्महत्या का केली? याचा शोध पोलीस घेत आहेत.

अनिकेत अंकुश कानगुडे (वय वर्ष २०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मुळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रूई धानोर गावातील रहिवासी होता. तो मागील २ वर्षांपासून लातूरमधील आरसीसी कोचिंग क्लासेसमध्ये NEET परिक्षेची करत होता. यंदाही तो NEET परिक्षेची तयारी करत होता.

मागच्या परिक्षेत त्याला ५२० च्या जवळपास गुण मिळाले होते. मात्र, वैद्यकीय प्रवेश मिळालेला नव्हता. पुन्हा तो नीट परीक्षेची तयारी करत होता. पण परीक्षेच्या एक दिवस आधीच त्याने आपल्या आयुष्याची दोर कापली. अनिकेतने आपल्या राहत्या खोलीतच गळफास घेत आत्महत्या केली आहे. गळफास घेतल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. अनिकेतनं आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचं कारण काय? याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर कुटुंब आणि परिसरातून शोक व्यक्त होत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply