NCP Supreme Court : नार्वेकरांच्या निकालाविरोधातील NCPच्या याचिकेवरील सुनावणी संपली; SCचे निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश

NCP Supreme Court : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाबाबत अजित पवार यांच्या बाजून निर्णय दिला होता. या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

यावर आज सुनावणी पार पडली, यावेळी सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला महत्वाचे निर्देश देताना निवडणुकीपर्यंत आत्ता त्यांना दिलेलं नाव कायम ठेवा असं म्हटलं आहे. तसेच नव्या चिन्हाबाबत निश्चित कालावधीत निकाल द्यावा

Kalyan News : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांच्या अडचणीत वाढ; पोलिसांकडून होणार प्रतिबंधात्मक कारवाई

अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे त्यांचं चिन्ह असल्याचा निकाल नुकताच निवडणूक आयोगानं दिला होता. या निकालाविरोधात शरद पवार गटानं दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं आज नोटीस काढली.

या नोटिशीत सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, ७ फेब्रुवारी रोजी निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला जे नाव दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार ते निवडणूक होईपर्यंत कायम ठेवावं. तसेच शरद पवार हे नव्या निवडणूक चिन्हासाठी पुन्हा निवडणूक आयोगात जाऊ शकतात. शरद पवार गटानं अर्ज केल्यानंतर आठवड्याभरात निवडणूक आयोगानं यावर निर्णय द्यावा, असे निर्देशही सुप्रीम कोर्टानं यावेळी दिले. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply