Mumbai : मागच्यावर्षी आजच्या दिवशी शिवसेनेत मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपला वेगळा गट स्थापन केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊन महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.
शिंदे- फडणवीस सरकार विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभरामध्ये गद्दार आणि खोके दिवस साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या या आंदोलनावेळी (NCP Protest) '50 खोके एकदम ओके' अशा घोषणा करत सरकारचा निषेध केला आहे. मुंबई पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक ताब्यात घेतले आहे. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. गद्दार दिनाच्या पार्शवभूमीवर मुंबई पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या होत्या. शिवसेनेच्या ठाकरे गटासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस पाठवल्या होत्या. आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला होता. अशामध्ये मुंबई पोलिसांनी आंदोलनापूर्वीच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे.
तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी गद्दार आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतले आहे. दक्षिण विभागातील अनेक शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. आजपहाटे या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी नोटीस बजावली होती. शिवसेना शाखेच्या खाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्ते आंदोलनासाठी येण्यास सुरुवात होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांसोबत वाद घालणाऱ्या दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे, उपनेते अरुण भाई दुधवडकर यांच्यासह काही शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली.
राज्यभरातही राष्ट्रवादीचे आंदोलन सुरु आहे. धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारविरोधात गद्दार आणि खोके दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत खोके दाखवत आणि त्यावर निषेदाचे मॅसेज झळकवत आंदोलन केले. यावेळी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरातील गोपाल टी इथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून गद्दार दिवस साजरा करत निषेध करण्यात आला. 50 खोके रस्त्याच्या कडेला ठेवून हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे 50 खोके आणि त्यावर लिहिलेला मजकूर सर्वांचे आकर्षण ठरले. या आंदोलनावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर, नागपूरच्या व्हेरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गद्दार आंदोलन करण्यात आले. 'हे सरकार पैशाच्या जोरावर आलं आहे', असा आरोप करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खोके सरकार म्हणत निषेध केला.
शहर
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
- Pune Shocking : पुण्यात आणखी एका 'वैष्णवी'चा बळी; सासरचा छळ असह्य झाला, महिलेने उचललं टोकाचं पाऊल
- Thane Water : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, बुधवारी शहरात पाणी कपात
- Kalyan : बारच्या नावाखाली वेगळाच प्रकार, तोकडे कपडे घालून अश्लील डान्स; पोलिसांनी सिनेस्टाईल छापा टाकला
महाराष्ट्र
- Corona Virus : आषाढी वारीच्या तोंडावर चिंता वाढली; माळशिरस तालुक्यात कोरोनाचे चार रूग्ण
- Beed : अवकाळीने सर्व हिरावले; शेतात सडलेल्या टमाट्यांचा लाल चिखल, शेतकऱ्याचे अश्रू अनावर
- Shocking Crime : गोठ्यातील जनावरांनाही सोडलं नाही, नराधमानं नको ते कृत्य केलं
- Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे प्रकरणात नवा ट्विस्ट, पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो? फॉरेन्सिक तपासातून सत्य बाहेर येणार
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण