NCP Political Crisis : ...म्हणून राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच; अजित पवार गटाचा दावा

NCP Political Crisis : राष्ट्रावादीचे नेते अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन्ही गटाकडून राष्ट्रवादी पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा केला जातोय. यादरम्यान विधीमंडळात सादर केलेल्या उत्तरात राष्ट्रवादी पक्ष मूळ आमचाच असल्याचा दावा अजित पवार गटाने केला आहे.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पाठवलेल्या नोटीसीला अजित पवार गटाकून विधिमंडळात २६० पानी उत्तर सादर केलं आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळ आमचाच आहे असा दावा करण्यात आला आहे.

Mumbai-Pune Express Way Block : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर आज तीन तासांचा ब्लॉक, कोणत्या मार्गाने वळवण्यात येणार वाहतूक?

दीड-ते दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना नोटीस जारी करण्यात आली होती. अजित पवार गटाने दिलेल्या उत्तरात आमचा गट हाच मूळ राष्ट्रवादी आहे, कारण पक्षाचे विधानसभेचे प्रतोद अनिल पाटील हे आमच्या बाजूने आहेत. तसेच आमदारांची संख्या देखील आमच्याकडे जास्त आहे.त्यामुळे मूळ राष्ट्रवादी ही आमची आहे. त्यामुळे संख्याबळाच्या बाबतीत निर्णय घेतला जावा अशी भूमिका घेण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर नोटीसला उत्तर देताना ही भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान लवकरच विधीमंडळात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा? आणि आमदार अपत्रतेच्या मुद्द्यावर सुनावणी सुरू होणार आहे, यापूर्वी अजित पवार गटाने पक्षावर दावा सांगितला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply