Naylon Manja : नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई; ५ हजाराचा दंड

Naylon Manja : नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असताना शहरात रस्त्यावर विक्री केली जात असल्याचा प्रकार  जळगावमध्ये समोर आला. या मांजा विक्रेत्यांवर महानगरपालिकेच्या पथकाने धाड टाकत कारवाई केली आहे. मांजा जप्त करत ५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पतंग उडविले जात असल्याने यासाठी नायलॉन, चायनीस मांजाचा सर्रास वापर केला जात असतो. या मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे मांजा विक्री व वापरास बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील मांजाची विक्री केली जात असल्याचा प्रकार सुरु आनंद अशांविरुद्ध महापालिकेने  तपासणी करत कारवाईला सुरवात केली आहे. यासाठी पथक तयार केले आहे. 

Cabinet Meeting Decision : आमदार अपात्रता निकालाच्या काही तास आधीच मंत्रिमंडळ बैठक, शिंदे सरकारने घेतले महत्त्वाचे 9 निर्णय

दुकानांची तपासणी 

पथकाने जोशी पेठेतील पतंग गल्लीत नऊ विक्रेत्यांच्या दुकानांची तपासणी केली असता एकाही जणाकडे मांजा आढळून आला नाही. एका दुकानाची तपासणी होत असतानाच अन्य विक्रेते सावध झाल्याची चर्चा आहे. मात्र ख्याँजामिया दर्ग्याजवळ मात्र एका जणाजवळ एक किलो मांजा आढळून आला. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करत जागेवरच पाच हजाराचा दंड आकारण्यात आला.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply