Navi Mumbai News : गव्हाच्या गोणीआडून गुटख्याची तस्करी, तुर्भे पोलिसांनी केला पर्दाफाश

Navi Mumbai News : गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ वाहतुकीस व विक्रीस परवानगी नाही. तरी देखील त्याची सर्रासपणे छुप्या पद्धतीने वाहतूक केली जात असते. असा प्रकार समोर आला असून गव्हाच्या गोणी आड गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना तुर्भे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. 

महाराष्ट्रात मध्य प्रदेश, गुजरात राज्याकडून गुटखा. तंबाखूची अवैधपणे वाहतूक केली जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. पोलिसांकडून कारवाई देखील झाली आहे. यानंतर देखील छुप्या पद्धतीने गुटख्याचीवाहतूक केली जात आहे. त्यानुसार गव्हाच्या गोणी आडून गुटख्याची होत असलेली वाहतूक तुर्भे पोलिसांनी पकडली आहे.

१० लाखाचा गुटखा जप्त 

मध्य प्रदेशमधून आलेल्या या कंटेनरला ताब्यात घेत तपासणी केली असता कंटेनरमध्ये सुरुवातील गव्हाच्या गोण्या असल्याचे दिसून आले. आतमध्ये जवळपास दहा लाख रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी गाडी आणि गाडीतील संपूर्ण माल जप्त केला असून चालक आणि वाहकाला अटक केले. हा गुटखा कुठून आला, कोणाला दिला जाणार होता; याचा अधिक तपास तुर्भे पोलीस करत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *