
पुण्यातील नवले पुलावरील भीषण अपघातासाठी कारणीभूत असलेल्या ट्रक ड्रायव्हरला चाकणमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी ड्रायव्हर मनीराम छोटेलाल यादव याला सिंहगड पोलिसांनी पुण्यातील चाकण मधून अटक केली आहे.
रविवारी २० नोव्हेंबरला रात्री पुण्यातील नरे आंबेगाव रोडवर ट्रक चालकाच्या चुकीमुळे तब्बल ४८ गाड्यांचा भीषण अपघात झाला होता. अपघातात आणि चालक आणि प्रवासी जखमी झाल्यानंतर आरोपी यादव हा ट्रक जाग्यावर सोडून गेला होता. आरोपी चाकणमध्ये (Pune) एका ट्रकच्या खाली लपून बसण्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत अटक केली आहे. आरोपी मनीलाल यादव यांच्यावर अपघाताप्रकरणी पुण्यातील सिंहगड पोलीस स्थानकात विविध कलमाने आहे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 487/2022 नुसार आणि भारतीय दंड विधान सहिंतेच्या कलम 279,337,338,427 नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. या अपघातात वाहन क्रमांक AP 02 TE 5858 चा चालक मनीराम छोटेलाल यादव, वय 24 रा.ग्राम उमरिया, तहसील गुड, जिल्हा रिबा मध्यप्रदेश याला अटक करण्यात आली आहे. त
सेच ट्रकवरील क्लीनर ललित यादव, वय 24, रा. ग्राम महूगंज जिल्हा रिबा मध्यप्रदेश यालाही सिंहगड रोड पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या दोन्ही आरोपींना चाकणमधील नानेकर वाडी येथून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्यात मोठी दुर्घटना घडली होती. नवले पूलावर कंटेनरचा ब्रेक फेल होऊन भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की यात सुमारे ४८ वाहने एकमेकांवर आदळली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


