Nashik Shivsena Morcha : ठाकरे गटाचा ड्रग्सविरोधात विराट मोर्चा; शिक्षण विभागाच्या आदेशाने प्राचार्य, मुख्याध्यापकांचं टेन्शन वाढलं

Nashik Shivsena Morcha : ड्रग्स तस्कर ललित पाटील यांचं नाशिक कनेक्शन समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. आज आज नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ड्रग्सविरोधात खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाकरे गटाचं कार्यालय असलेल्या शालिमार ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चाचा मार्ग असणार आहे. 

या मोर्चादरम्यान शिक्षण विभागाने काढलेल्या एका आदेशाची चर्चा सुरु आहे. जिल्हा परिषद शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आजच्या ठाकरे गटाच्या मोर्चात सहभागी न होण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नाशिकच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी याबाबतचं पत्र शाळा, महाविद्यालय प्राचार्य आणि मु्ख्याध्यापकांना पाठवलं आहे.

Sharad Pawar: पवारांनी घेतला लोकसभा मतदार संघांचा आढावा; जागा वाटपाची बैठक दसऱ्यानंतर

प्रशासकीय कारवाईचा इशारा

नाशिकमध्ये आज ड्रग्सविरोधात मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांना सहभागी होण्यास परवानगी देऊन नये असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आहे. या मोर्चात विद्यार्थी सामील झाल्यात आपल्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत.

 

आदित्य ठाकरेही सहभागी होणार?

खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार असून आदित्य ठाकरे देखील या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती आहे. दरम्यान या ड्रग्सविरोधी मोर्चात शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं, असं आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलं आहे.

मात्र मोर्चात शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आढळल्यास कारवाई करण्याचा इशारा शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या मोर्चावरून पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply