Nashik Rain News : नाशिकमध्ये अनेक जिल्ह्यांत बरसल्या पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Nashik Rain News : राज्यात अनेक जिल्ह्यांत उन्हाचा कहर झाला आहे. अशात नाशिक जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वतावरणासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मालेगाव शहरात व परिसरात अवकाळी पावसाने हजेरी देखील लावली आहे.

मालेगावचा पारा काल 42 अंशावर होता मात्र. सकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन अवकाळी पावसाने  हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावला आहे. तर उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

लासलगाव तसेच चांदवड तालुक्यातील सोनी सांगवी, विटावे, सळसाने,पाटे, कोलटेक परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरून देखील पाणी वाहू लागले आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply