Nashik Police News : नाशिकचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची बदली, संदीप कर्णिक नवे आयुक्त

Nashik Police News : नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे  यांची बदली करण्यात आली असून त्या ठिकाणी नवे पोलीस आयुक्त म्हणून संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संदीप कर्णिक यापूर्वी पुण्याचे पोलीस सहआयुक्त होते. मावळते आयुक्त अंकुश शिंदे यांची राज्य गुप्त वार्ताच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे.

नाशिक शहरातील गुन्हेगारी आणि ड्रग्स प्रकरणी मुबंई, पोलिसांनी नाशिकमधे कारवाई केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पुण्याचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Kartiki Ekadashi 2023 : कार्तिकी निमित्त पंढरपुरात ३ हजार पोलीसांचा राहणार वाॅच, बंदोबस्तासाठीची ऑनलाइन प्रणाली विकसीत

 अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच बदली

अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिकचे पोलीस आयुक्तायलाची जबाबदारी 13 डिसेंबर 2022 रोजी देण्यात आली होती. त्या आधीचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची नऊ महिन्यातच बदली करण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसवण्यात ते अपयशी ठरत असल्याने त्यांची बदली करून त्या ठिकाणी अंकुश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. अंकुश शिंदे यांनी या आधी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी पार पाडल्यान ते नाशिकच्या गुन्हेगारीला आळा घालतील अशी अपेक्षा होती. 

नाशिकमधील वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्ज प्रकरणी निर्बंध घालण्यात पोलिसांना आलेल्या अपयशानंतर आता अंकुश शिंदे यांची दहा महिन्यातच पुन्हा बदली करण्यात आली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply