Nashik News : गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; लहान- मोठ्या नाल्यांना पूर

Nashik News : दोन दिवसांपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर गोदावरी यंदा प्रथमच दुथडी खळाळून वाहिली. मात्र सर्वच सांडवे पाण्याखाली गेल्याने गाडगे महाराज पुलासह, दिल्ली दरवाजा, सोमवार पेठ, नेहरू चौक, दहिपूल भागात दिवसभर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली.

पावसाच्या मोठ्या खंडानंतर गुरुवारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीसह लहान- मोठ्या नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे गोदापात्रालगतचे सर्वच सांडवे (मोऱ्या) पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सर्व वाहतूक गाडगे महाराज पुलावरून सुरू आहे. 

परंतु आधीच मोठ्या प्रमाणावर पार्क करून ठेवलेल्या चारचाकींमुळे पुलावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली. गाडगे महाराज पुलावरून वाहन पार्किंगबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होऊनही वाहनधारक पुलावरच मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करतात.

Morocco Earthquake : मोरोक्कोत मृत्यूचे तांडव! भयंकर भूकंपात २००० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू; देशभरात हाहाकार

पार्क केलेल्या वाहनांमुळे आधीच पुलाची क्षमता निम्मी होऊन जाते, त्यातच गोदावरीला पूरसदृश स्थितीमुळे सर्वच वाहने पुलावरून जात आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. कोंडीनंतर दुपारी आलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहनांचे फोटोही काढले, आता त्यावर काय कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

एरवी पुलाखालून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते, परंतु पाण्यामुळे सर्वच वाहने पुलावरून जात असल्याने दिल्ली दरवाजा, सोमवार पेठ, नेहरू चौक, तिवंधा चौक, दहिपूल भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी अनुभवण्यास मिळाली.

पूर पाहण्यास होतेय गर्दी

संपूर्ण जून, जुलै व ऑगस्ट कोरडा गेल्यावर गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसानंतर गंगापूर धरणातून दुसऱ्यांदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सध्या गोदावरी दुथडी वाहत आहे. त्यामुळे पूर पाहण्यासाठी आसुसलेल्या नाशिककरांनी पाण्याची वाढलेली पातळी पाहण्यासाठी गाडगे महाराज पुलावर गर्दी केली होती, त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply