Nashik News : मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध; नाशिक जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

नाशिक : दुधात भेसळ करून विक्री करत जीवाशी खेळ सुरु असल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात समोर आला आहे. दूध डेअरीमध्ये मिल्क पावडर कॉस्टिक सोड्याचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या कारवाईत समोर आला आहे. 

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यामध्ये असलेल्या मिरगाव येथील एका दूध डेअरीमध्ये हा प्रकार समोर आला आहे. मिल्क पावडर कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवण्यात असल्याची पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिक ग्रामीण पोलिसांनी ओम सद्गुरु दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला. या दरम्यान चक्क भेसळयुक्त दूध बनवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

Pune Crime : पाच अल्पवयीन मुलांकडून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; थरारक घटनेनं पुण्यात खळबळ

दोन संशयित ताब्यात 

ओम सद्गुरु दूध संकलन केंद्र या ठिकाणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत संतोष हिंगे व प्रकाश हिंगे या दोन संशयतांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार किती दिवसापासून सुरू आहे. याच्यामध्ये अजून कुणाचा सहभाग आहे. याचा तपास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र या दूध संकलन केंद्रावर नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात होता; त्यांच्यावर  कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता नागरिक करू लागले आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply