Nashik : नाशिक हादरलं! जमिनीच्या वादातून वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळलं; निफाड तालुक्यातील घटना

Nashik : शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात घडली. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कचेश्वर नागरे (वय ८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मात्र, जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील खर्डी सारोळे गावात ही घटना घडली आहे.

Follow us -

Pune Police : पुणे शहरात पोलिसच असुरक्षित?, कार अडवल्याचा राग; थेट पोलिसांना मारहाण करत दिली धमकी

मृत कचेश्वर नागरे यांचा शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांसोबत जमिनीवरून वाद सुरू होता. या वादातून आरोपींनी नागरे यांच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत नागरे हे ९५ टक्के भाजले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शेजारी राहत असलेल्या कुटुंबियांकडूनच कचेश्वर नागरे यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला जातोय. आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका नागरे कुटुंबीयांची घेतली आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply