Nashik News : वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा, गोळीबार आणि कोयत्याने वार; 5 जखमी

Nashik News : टीम इंडियाने  टी- २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर राज्यासह देशात सगळीकडेच आनंदाचे वातावरण आहे. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर ठिकठिकाणी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अशात नाशिकमध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर जल्लोष करताना दोन गटात राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या राड्यादरम्यान गोळीबार आणि कोयत्याने वार करण्यात आले. या घटनेमध्ये ५ जण जखमी झाले आहेत. यामधील एकाच्या पायाला गोळी लागली. ही घटना नाशिकरोड परिसरात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर नाशिकरोड परिसरात मध्यरात्री तरुणांनी मोठ्यासंख्येने एकत्र येत जल्लोष केला. यावेळी दोन गटामध्ये तुफान राडा झाला. या राड्यात बंदुकीतून गोळीबार आणि कोयत्यांचा सर्रास वापर करण्यात आला. गोळीबारामध्ये एका व्यक्तीच्या पायाला गोळी लागली. या राड्यामध्ये देवळाली गाव आणि विहितगाव येथील ५ जण जखमी झालेत.

Ashadhi Wari : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर, भक्तनिवासमध्ये अल्पदरात मिळणार नाश्ता आणि जेवण, मंदिर समितीनं हॉटेल घेतलं ताब्यात

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. २४ तासांत नाशिकरोड परिसरात ही दुसरी मोठी घटना घडली. विहितगावचे जमधडे, हांडोरे यांच्या गटात राडा झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या राड्यात जखमी झालेल्यांना नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, नाशिक रोड परिसरात कोयता आणि बंदुकीचा सर्रास वापर टवाळखोरांकडून केला जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply