Nashik News : चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे एकाच दिवसात २ रुग्णांचा मृत्यू, नागरिकांमध्ये घबराट

Nashik News : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. पावसाळ्याआधीच स्वाईन फ्ल्यूने डोकं वर काढल्याचं चित्र आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे नाशिकमध्ये एकाच दिवसात २ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यामुळे इतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण दिसत आहे. हे रूग्ण जेलरोड परिसर आणि दिंडोरीतील असल्याचे माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जेलरोड परिसरातील सेवानिवृत्त एअरफोर्स कर्मचारी आणि दिंडोरीतील एका महिलेवर उपचार सुरू होते. त्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं समोर आलं  होतं. या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पावसाळ्याआधीच डेंग्यूने डोकं वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये चिंताजनक वातावरण आहे. स्वाईन फ्लूमुळेनाशिककरांची चिंता वाढली आहे.

Beed News : बीड जिल्ह्यात १५ जूनपर्यंत मनाई आदेश लागू; पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी

यात दोघांचा बळी गेल्याचं समोर आलंय.नाशिक शहरात पावसाळ्याआधीच डेंग्यू बाधित रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. महिनाभरात शहरात डेंग्यूचे ३३ रुग्ण आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तर मागील ५ महिन्यात २८ जणांना स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पावसाळ्याआधीच स्वाईन फ्ल्यू आणि डेंग्यूने डोकं वर काढल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. यात दोघांचा बळी गेल्याचं समोर आलंय.नाशिकमध्ये स्वाईन फ्लूमुळे आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलंआहे.

नाशिकमध्ये रूग्णांचा स्वाईन फ्लूमुळे  मृत्यू झाल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. थंडी ताप, सर्दी, खोकला, नाक गच्च होणे, घसा दुखणे, अतिसार, चक्कर येणे आणि शरीर दुखणे ही स्वाईन फ्लुची लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास नागरिकांनी तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याची गरज आहे. सर्दी खोकला जाणवल्यास तातडीने उपचार घेणे गरजेचे आहे.
 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply