Nashik : शेतात काम सुरू असताना मोठी दुर्घटना! अंदाज न आल्याने डंपर विहिरीत पडला; चालकाचा दुर्दैवी अंत

Nashik : शेतामध्ये खोदकाम सुरू असताना अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यामध्ये घडली. या दुर्घटनेत डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडलेल्या या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रब्बी हंगाम संपवून खरीप हंगामाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. शेतीची मशागत, बि- बियाणांची खरेदी तसेच शेतातील विहिर, पाणी साठ्याच्या उपाययोजना करण्यात बळीराजा व्यक्त आहे. अशातच शेतामध्ये लेव्हल करण्याचे काम सुरू असताना डंपर कोसळून झालेल्या दुर्घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

Buldhana Accident : बुलढाण्यात चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार पलटली; १ जागीच ठार ४ गंभीर जखमी

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील निमोण गावात शेतीच्या सपाटी करणाचे काम सुरू होते. त्यासाठी डंपर लावण्यात आले होते. यावेळी सपाटीकरण करण्यासाठी माती टाकत असताना विहिरीचा अंदाज न आल्याने डंपर थेट विहिरीत पडला. यामध्ये डंपर चालक अक्षय दळवी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. चांदवड पोलीस अधिक तपास करत आहेत

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने उसाचे पीक पाण्याअभावी जळून गेले आहे. मागील अनेक दिवसापासून पाणीच नसल्याने ऊस जागीच जळून गेल्याची स्थिती सोलापुरात सर्वत्र पाहायला मिळतेय.त्यामुळं उसाच्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply