Nashik News : लासलगावमध्ये छगन भुजबळांना दाखवले काळे झेंडे

Nashik News : राज्यात गेल्या चार दिवसांपासून अवकाळी पावसाने हाहाकार माजवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याचे मंत्री छगन भुजबळ आज नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करत आहेत. मात्र मराठा आंदोलकांचा भुजबळांच्या या पाहणी दौऱ्याला जोरदार विरोध पाहायला मिळत आहे. लासलगावमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा- ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. मराठा आंदोलक जरांगे पाटील मनोज आणि ओबीसी नेते  छगन भुजबळांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याचेच पडसाद छगन भुजबळांच्या  पाहणी दौऱ्यावर पडल्याचे दिसत असून नाशिकमधील मराठा बांधवांनी भुजबळांच्या दौऱ्याला जोरदार विरोध केला.

Chhatrapati Sambhaji Nagar Income Tax Department Raids : छत्रपती संभाजीनगरमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २०० अधिकाऱ्यांकडून बड्या व्यावसायिकांची झाडाझडतीhttps://punenews24.in/latest-news/chhatrapati-sambhaji-nagar-income-tax-department-raids/

येवला तालुक्यातील नुकसान पाहणी संपवून भुजबळ निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जात होते. भुजबळांचा ताफा लासलगाव मार्गे कोटमगाव मार्गे जात असताना कोटमगाव येथे मराठा समाजाच्या कार्यकऱ्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रोखले. तसेच ताफा पुढे गेल्यानंतर आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवत भुजबळ गो बॅक चे नारे दिले.

आंदोलकांमुळे बदलावा लागला मार्ग..

दरम्यान, आजच्या दौऱ्याला सुरूवातीपासूनच मराठा बांधवांनी विरोध केल्याने छगन भुजबळांना आपला मार्गही बदलावा लागला होता. सकाळी छगन भुजबळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी निघाले. विंचूर चौफील येथे मराठा जमले असल्याने पोलिसांच्या विनंतीनंतर छगन भुजबळ यांनी आपल्या दौऱ्याचा मार्ग बदलून दुसऱ्या मार्गावरुन पाहणी दौऱ्यासाठी मार्गस्थ झाले होते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply