Nashik News : नांदूरमध्यमेश्वरचे 2 गेट उघडले; 2 दिवस सुरू राहणार विसर्ग

Nashik News : जिल्ह्यातील गंगापूर, कडवा, मुकणे व दारणा धरणातून सोडलेले पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणातून ‘जायकवाडी’ला सोडण्यासाठी दोन गेट उघडले आहेत. दोन दिवस येथून पाण्याचा विसर्ग सुरू राहील.

पाणी सोडण्याच्या वेळी छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक पाटबंधारे विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली; संभाजीराजे दिल्लीत दाखल

नांदूरमध्यमेश्वरमधून सोमवारी (ता. २७) सकाळी १६ हजार ७८१ क्यूसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पुन्हा विसर्गात कपात करण्यात येऊन १२ हजार ६२० क्युसेक वेगाने करण्यात आला आहे.  धरणातून पाणी सोडण्यात आल्याने  गोदावरी नदीच्या पातळीत वाढ झाली. नदीकाठावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवस हा विसर्ग सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी कार्यकारी अभियंता मनोज डोके, जायकवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक नखाते, निफाड तहसीलदार शरद घोरपडे, प्रशांत गोवर्धने, वैभव आडसूळ, योगेश राठोड, शरद नागरे, कचरू कातकाडे, टी. एस. मनवर उपस्थित होते.

संनियंत्रण समिती स्थापन

जिल्ह्यातील धरणातून ‘जायकवाडी’ला पाणी सोडण्यात आल्यावर यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व अधिकचे पाणी ‘जायकवाडी’ला जाऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.

त्यानुसार अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून आवश्यक तेवढेच पाण्याचा विसर्ग होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. या समितीत नाशिकचे प्रांत जितीन रहेमान, इगतपुरी प्रांत रवींद्र ठाकरे, निफाड प्रांत हेमांगी पाटील यांचा समावेश आहे.

असा होणार विसर्ग

धरण प्रकल्प- दलघफू

गंगापूर : ५००

मुकणे : ४८४

कडवा : ३००

दारणा : १८५९

एकूण : ३१४३



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply