
Nashik Maratha Andolan : एकीकडे राज्यभर मराठा आंदोलनाचेलोण पसरले असून आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागल्याचे देखील पाहायला मिळाले. तर नाशिकमध्ये देखील मराठा समाज रस्त्यावर उतरला असून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु आहे. आज नाशिक तालुका परिसरातील गावांनी एकत्र येत पुन्हा एकदा भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. नाशिक-पुणे मार्गावरील शिंदे गावापासून ते नाशिकरोडपर्यंत असा अकरा किलोमीटरचा हा भव्य मोर्चा काढण्यात आला.
मराठा आरक्षण मागणीवरून मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम असून शासनाने लवकरात लवकर आरक्षण निर्णय घेण्याचे आवाहन त्यांच्याकडून केले जात आहे. दुसरीकडे राज्यात असंतोष असून अनेक ठिकाणी बसेसची तोडफोड, राजकीय नेत्यांच्या कार्यालयांच्या तोडफोड, जाळपोळ केली जात आहे. त्यामुळे आता मराठा समाज रस्त्यावर येत आंदोलने केली जात आहेत. नाशिकमध्ये देखील सकल मराठा समाज बांधवाच्या माध्यमातून भव्य मोर्चा काढण्यात आला. शिंदे, पळसेसह आजुबाजुंच्या विविध गावातील ग्रामस्थांचा हा मोर्चा असून या मोर्चाला मराठा बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जवळपास शिंदे गावापासून ते नाशिकरोड पर्यंत असा अकरा किलोमीटरचा मोर्चा पायी मूक मोर्चा काढण्यात आला होता.
|
|
शिंदे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या भव्य पायी मूक मोर्चाला सुरवात झाली. त्यानंतर पळसेमार्गे चेहेडी, सिन्नर फाटा नाशिकरोड पर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात हजारो समाज बांधव एकवटल्याचे पाहायला मिळाले. त्यात मोहगाव, शिंदे, पळसे, बाभळेश्वर, चेहेडी, जाखोरी, चांदगीरी कोटमगाव, सामनगाव, नानेगाव, शेवगेदारणा, वडगाव आदी गावांसह परिसरातील मराठा बांधवानी या मोर्चात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. मराठा समाजाला हक्काचा आणि कायमस्वरूपी टिकणार आरक्षण मिळावं तसेच मराठा बांधवांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे यासाठी भव्य पायी मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी नाशिकरोड या ठिकाणी मोर्चा आल्यानंतर याच ठिकाणी एकूण तीन उपोषण सुरु असून यातील एका ठिकाणी एक महिला आपल्या सात महिन्याच्या बाळासह उपोषणासाठी बसलेली असल्याचे पाहायला मिळत आहे.
कॅण्डल मार्च, मशाल मोर्चानंतर भव्य पायी मूक मोर्चा
सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी मोर्चाचे आयोजन केलं जात आहे. काल कराडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने एक मोठा मोर्चा काढला गेला होता. काल नाशिक शहरांमध्ये कॅण्डल मार्च, मशाल मोर्चा काढण्यात आलेला होता. त्यानंतर आज ग्रामीण भागातील समाज बांधवानी एकत्र येत भव्य पायी मोर्चा काढण्यात आला. अनेक गावातले आंदोलक या मोर्चा स्थळी एकवटलेले पाहायला मिळाले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यातल्या विविध भागांमध्ये मोठमोठे मोर्चे काढले जातात. त्याच पार्श्वभूमीवर नाशिक मध्येही मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या मोर्चाचं सहभागी झाल्याचे दिसून आले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती




























Subscribe to my channel


