Nashik Ganesh Visarjan : विसर्जनानंतर नाशिक मध्ये दु:खाचं वातावरण; ४ वर्षीय चिमुकल्यासह विविध घटनेत ८ जणांचा मृत्यू

Nashik Ganesh Visarjan : नाशिक शहरात काल दिवसभर गणपती विसर्जनाची धामधूम पाहायला मिळाली. विसर्जनावेळी लाखोंच्या संख्येने भाविक रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पसरले होते. अशात नाशिक शहरात काल विसर्जनावेळी बऱ्याच दुर्घना घडल्या. यामध्ये एकूण ८ जणांना आपला जीव गमवावा लागला. 

Lalbaugcha Raja Visarjan : लाडक्या लालबागच्या राजाला 22 तासांनी निरोप, हायड्रॉलिक्सचा वापर करत राजाचं केलं विसर्जन

मिळालेल्या अधिक माहितीनुसार,नाशिकच्या गणेश विसर्जनाच्या उत्सवात ८ जणांचा विविध घटनेत मृत्यू झाला आहे. यात ७ जणांचा पाण्यात बुडून तर ४ वर्षीय चिमुरड्याचा ट्रॅक्टर खाली सापडून मृत्यू झाला आहे. नाशिकच्या गोदावरीमध्ये ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस तपासात आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर एकाचा अद्याप शोध सुरू आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी तसेच जीवरक्षक यांच्या मदतीने शोधकार्य सुरू आहे. वालदेवी धरणार २ महाविद्यालयीन तरुणास एक विवाहित तरुणाचाही काल मृत्यू झालाय. पाण्याचा अंदाज न आल्याने युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply