Nashik Crime News : नाशिकमध्ये रात्रीच्या अंधारात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; नदीपात्रात उतरुन कोट्यवधींचं ड्रग्स जप्त

Nashik Crime News : ड्रग माफिया ललित पाटीलने ड्रग्सचे रॅकेट नाशिकच्या ग्रामीण भागातही पसरवलं असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात ड्रग्सचा मोठा साठा सापडल्यानं खळबळ उडाली आहे. ललित पाटीलच्या अटकेनंतर मुंबई पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. 

मुंबई पोलिसांनी आता नाशिकच्या ग्रामीण भागात सर्च ऑपरेशन सुरु केलं आहे. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपासून मुंबई पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी गिरणा नदी पात्रात पोलिसांना कोट्यवधींचं ड्रग्स सापडलं आहे. 

Mohan Bhagwat : 'काही लोकांना देशाची प्रगती पाहायची नाही', सरसंघचालक मोहन भागवतांचा विरोधकांवर निशाणा

मध्यरात्रीपासून सुरू असलेले शोधकार्य आज सकाळी देखील सुरूच आहे. पोलिसांकडून नदीपात्रातून ड्रग्ज बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याच्या चौकशीतून याबाबतची माहिती समोर आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या टीमने रात्री २ वाजता नदीत अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने ड्रग्जचा शोध घेतला.

ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघ याने हे ड्रग्स नदी पात्रात दोन पोते फेकलं होतं. ड्रग्ससाठा ४० ते ५० किलोचा असल्याची माहिती मिळत आहे. याची किंमत जवळपारस १०० कोटी रुपये या ड्रग्सची किंमत असल्याची माहिती समोर येत आहे. सचिन वाघ याने हे ड्रग्ज नष्ट करण्याच्या उद्देशाने नदीपात्रात फेकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पोलिसांनी नदीपात्रात सुरुवातीला कॅमेरा सोडला. ड्रग्सचा साठा पाण्यात जवळपास १५ फूट खोल आढळून आला आहे. रात्रीच्या अंधारात स्कूबा ड्रायव्हर्सच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. रात्रीच्या अंधारात पाण्यातून हा ड्रग्ससाठा बाहेर काढण्यात अडचणी येत होत्या. मात्र सकाळी जवळपास १५ फूट खोल उतरुन ड्रग्सचा साठा बाहेर काढण्यात आला.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply