Nashik Crime : कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याची बतावणी, कोपऱ्यात खोली घेऊन मोठा कांड; नाशकात १५० अमेरिकन नागरिकांना...

Nashik Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. नाशिकमध्ये अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉम्प्युटरमध्ये बिघाड झाल्याचे सांगत तब्बल १०० ते १५० अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचं समोर आलं आहे. अमेरिकन नागरिकांच्या संगणकावर नोटिफिकेशन पाठवून तुमच्या संगणकात व्हायरस असल्याचे सांगत दुरुस्तीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली आहे.

आत्तापर्यंत २ लाख ४० हजार डॉलर्सची फसवणूक करण्यात आली आहे. नाशिकच्या अश्विननगर परिसरात हे कॉल सेंटर सुरु होतं, त्यातून हा काळाबाजार केला जात असल्याचं समोर आलं आहे. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना नोटिफिकेशन पाठवून फसवणूक केली जात होती. नाशिक पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. अश्विननगर परिसरातील एका बंगल्यात हे कॉल सेंटरमधून हा गोरखधंदा केला जात होता.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply