Nashik–Akkalkot Expressway : नाशिक ते अक्कलकोट अवघ्या ४ तासांत; सहा लेन सुपरहायवेचा आराखडा, मार्ग कसा असेल?

Nashik–Akkalkot Expressway : देशातील सहा राज्यांना जोडून एक नवीन एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे उभारण्यात येणार आहे. या कॉरिडोरचा नाशिक-चेन्नई दृतगती मार्ग हा खूप महत्वाचा आहे. सुरतवरुन हा मार्ग चेन्नईला जाणार आहे. हा मार्ग नाशिकमधून जात आहे.नाशिकमध्ये सहा पदरी एक्सप्रेसवे उभारला जाणार आहे.यामुळे तीन धार्मिक स्थळे जोडली जाणार आहे. नाशिकवरुन तुम्हाला थेट अक्कलकोटला जाता येणार आहे.

हा दृतगती मार्ग नाशिकमधून जाणार आहे. त्यानंतर पुढे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. यामुळे नाशिककरांना वाढवण बंदर आणि चेन्नईतील बंदर या दोन्ही सागरी मार्गांना जोडणारा रस्ता मिळणार आहे. वाढवण ते चेन्नई ही दोन महत्त्वाची बंदरे या एक्सप्रेसवेमुळे जोडली जाणार आहे.

Mahanagarpalika Elections : धुरळा उडाला! राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा; १५ जानेवारीला होणार मतदान

हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये विभागलेला आहे. पहिला टप्पा हा अक्कलकोटपर्यंत असणार आहे तर उरलेला भाग दुसऱ्या टप्प्यात असणार आहे. अक्कलकोटपर्यंतचा हा मार्ग ३७४ किमी लांबीचा असणार आहे. सध्या नाशिक ते अक्कलकोट अंतर ५२४ किमी लांब आहे. या मार्गासाठी ९ तासाचा वेळ लागतो. नवीन मार्गामुळे हे अंतर १५० किमीने कमी होणार आहे. त्यामुळे प्रवास ५ तासाने कमी होणार आहे. फक्त ४ तासांमध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे.

सुरत-चेन्नई महामार्ग सहा राज्यांना जोडणार आहे. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमधून हा महामार्ग जाणार आहे. हा देशातील दुसरा सर्वात लांब दृतगती मार्ग ठरणार आहे. नाशिकवरुन चेन्नईला जाणारा हा मार्ग आंध्र प्रदेशातून जाणार आहे. त्यामुळे तिरुपतीला थेट जाता येणार आहे. या प्रवासाला २२ ते २३ तासाचा वेळ लागायचा तो प्रवास फक्त १२ तासात पूर्ण होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *