Nashik Accident News धानोरे शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दोन मुली जखमी

Nashik Accident News : नाशिक जिल्ह्यातील येवला तालूक्यातील धानोरे शिवारात येवला-मनमाड मार्गावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार दिपक नामदेव खुळे यांचा उपचारादरम्यान येवला उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. 

या घटनेत त्यांच्या सोबत असलेल्या दोन कॉलेजच्या विद्यार्थींनी जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात वाहनचालक हा फरार झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.

Ashok Chavan : काँग्रेस सोडून भाजपात गेले, तेव्हा काय केलं; अशोक चव्हाण यांचा नाना पटोलेंना सवाल

 

भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून दुचाकी चोरी

भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौकातून अज्ञात चोरट्याने सुना मोका पाहून दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत. दरम्यान भंडारा शहरात आता चोरीच्या घटनांत वाढ होत असल्याने पोलिसांच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply