Nashik Accident : द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशरची कंटेनरला धडक; मायलेकींचा जागीच मृत्यू

Nashik Accident : नाशिक शहरात भीषण अपघाताची घटना घडली असून द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशर कंटेनरमध्ये (Eicher) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू  झाल्याची घटना घडली आहे. तर कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाल्याचे समजते आहे. आज सकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.

नाशिक शहरात अपघाताच्या घटना नित्याच्या झाल्या असून रोजच कुठे ना कुठे अपघात घडत आहे. अशातच नाशिक मुंबई महामार्गावर आज सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. आडगाव द्वारका उड्डाणपुलावर हा अपघात झाला असून यात आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळच्या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत असून पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा तपास पंचवटी पोलिसांकडून करण्यात येत आहे. 

नाशिक ते मुंबई मार्गावर द्वारका ते आडगाव हा उड्डाणपूल आहे या मार्गावर अनेकदा वाहने बंद पडतात. मात्र सुरक्षेची कुठलीही काळजी संबंधित चालक किंवा वाहतूक पोलिसांकडून घेतली जात नाही, अशातच द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर आयसर हा बंद अवस्थेत उभा होता. सकाळच्या सुमारास कंटेनरने  आयसरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनरच्या चालकाच्या सोबत ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांच्याकडून अधिक तपास केला जात आहे. इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने हा कंटेनर निघाला होता आणि याचवेळी नाशिक शहरात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. 

उड्डाणपुलावर अपघात वाढले... 

दरम्यान या अपघातात घरी निघालेल्या मायलेकींचा मृत्यू झाला असून ड्रायव्हर गंभीर जखमी झाला आहे. या उड्डाणपुलावर दुचाकीला देखील प्रवेश नाही, मात्र उड्डाणपुलावरून भरधाव वेगाने जात असल्याचे चित्र पाहायला मिळते. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत असतात. अशातच आज सकाळी ही घटना घडली आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना अपघाताला देखील निमंत्रण दिले आहे. रोजच शहरातील विविध भागात अपघाताच्या घटना घडत आहे. अशावेळी मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता उड्डाणपूल देखील धोकादायक बनत चालले असून अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने अशावेळी अपघात होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply